वेल्या साप (व्हाईन स्नेक)
अहितुला नासुटस (Ahaetulla nasutus)

निम्न विषारी

मराठी : तणसाप, वेल्या साप.

विशिष्ट लक्षणे : आकाराने मध्यम, तसेच, मोठे, काठीसारखे गोल. पाठीवर गुळगुळीत व मंद वर्णाचे खवले. डोके लांब व चिंचोळे. शरीरावरील भागाचा रंग हिरवा.
सरासरी लांबी : मादी 1 मी.; जन्मत: 20 सें. मी.; कमाल: 2 मीटर.

वर्णन : वेल्या साप लांब व बारीक असतो. त्याच्या तोंडाचा पुढील भाग निमुळता व टोकदार असतो. अंगाचा रंग पोपटी हिरवा. पाठीवर गुळगुळीत खवले असतात, परंतु ते चकचकीत नसतात. पोट व पाठीवरील खवल्यांचे जणू पृथकत्व दर्शविणारी एक पांढरी किंवा पिवळी रेषा जन्मतःच असते. दक्षिण भारतातील 2300 मीटर उंचीवरील पर्वतांत आढळून येणान्या या सापांच्या उपजातीच्या डोक्याचा रंग गुलाबी- तांबडा असतो. शरीराच्या खालच्या भागाचा रंग फिकट हिरवा किंवा पिवळा असतो. तो चवताळला, म्हणजे मान व पूर्ण अंग ताणतो. त्या वेळी शरीरावरील खवल्यांचा काळा व पांढरा रंग स्पष्टपणे नजरेत भरतो. त्या स्थितीत तो आढळला, तर त्याच्या अंगावर पट्टे असल्याचा भास होतो. आडवे व लंबवर्तुळाकार डोके हे या सापाचे वैशिष्ट्य आहे. भारतातील इतर सर्वांत हे वैशिष्ट्य कोठेही आढळून येत नाही. हा साप सामान्य असला, तरी तो त्याच्या रंगगोपनामुळे कचितच दृष्टीस पडतो.


वितरण : वायव्य भाग व गंगेच्या खोऱ्याचे बहुतेक क्षेत्र वगळता भारतात सर्वत्र 2500 मीटर उंचीपर्यंत आढळून येतो.


निवासस्थान : पठारावरील झाडे व झुडपे यांवर आढळून येतात. तसेच, ते डोंगराळ भागातील वर्षावनांतील झाडांवरही सापडतात.

सवयी : हे साप त्यांचा आकार व रंगवैशिष्ट्यामुळे नजरेतून निसटून जातात. ते जलद गतीने सरपटतात, चवताळले, म्हणजे ते तोंड वासतात व शरीरही ताणतात. तेव्हा ते अत्यंत भीतिदायक दिसतात. वेल्या सापाचे विष सौम्य आहे. त्यामुळे से आपले भक्ष्य पूर्णपणे मृत होईपर्यंत आपल्या पुढील दातांनी घट्ट पकडून ठेवतात. विणीच्या काळात अनेक साप एकत्रित आल्यामुळे त्यांचा गुंताळा दिसतो. अशा अवस्थेत ते फांद्यांवरून लोंबताना दृष्टीस पडतात.

वीण : मद्रास भागात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत एका सर्पिणीने 8 पिले दिल्याचे आढळून आले. पिले दिसायला मोठ्या सापासारखीच असतात. लहान पिलांचे नाक मात्र किंचित बाकदार असते.


भक्ष्य : मुख्यत्वे सरडे, बेडूक, उंदीर व लहान आकाराचे पक्षी. श्रीलंकेत हे साप मासे पकडून आले. गिळताना आढळून आले. तसेच, ते कानेरा सापालाही गिळताना दिसून आले.स्थिती : सामान्य. वेल्या साप तसा निरुपद्रवी आहे. तरीपण त्याची भीती वाटत असल्यामुळे दिसताक्षणीच त्याची हत्या करण्यात येते. वेल्या साप माणूस दिसताच त्यावर झडप घालून त्याचे डोळे फोडतो अशी वेडी समजूत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.

स्थिती : सामान्य. वेल्या साप तसा निरुपद्रवी आहे. तरीपण त्याची भीती वाटत असल्यामुळे दिसताक्षणीच त्याची हत्या करण्यात येते. वेल्या साप माणूस दिसताच त्यावर झडप घालून त्याचे डोळे फोडतो अशी वेडी समजूत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *