Rescue Team

भारतीय (चष्मा) नाग [इंडियन (स्पेक्टॅकल्ड) कोब्रा ] नाजा नाजा नाजा (Naja naja naja )

विषारी

मराठी : नाग, नागोबा.

विशिष्ट लक्षणे : आकाराने मध्यम, तसेच, मोठेदेखील. शरीर गुळगुळीत, सर्वांगावर चकचकीत खवले; डोके व मान रुंद; मानेखाली रुंद काळा पट्टा, फण्यावर मराठी दहाच्या आकड्यासारखे स्पष्ट चिन्ह असते.

9 फूट अजगराचे वाचविले जीव.

दिनांक 2/11/ 2022 ला सडक अर्जुनी तालुक्यातील श्री प्रणित जागेश्वर पटोले यांच्या शेतात धान कापत असतांना मजुरांच्या पायाजवळ 9 फूट लांबीचा एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Rescue Spectacule Cobra

भागवत चव्हाण बोथली यांच्या येथे पाच फूट लांबीचा भारतीय चष्मा नाग पकडण्यात आला त्यावेळी संस्थेचे सर्पमित्र शुभम नंदेश्वर, गौरव गाते, अमन राऊत, अश्विन नंदेश्वर आणि ग्रामस्थ परमानंदजी बागडे सर उपस्थित होते.

धामण प्रजातीच्या सापाला जीवनदान

03/08/2022 सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री आर. व्ही. मेश्राम सर यांच्या घरी निघालेला धामण प्रजातीचा साप सर्पमित्र शुभम नंदेश्वर यांनी बड्या शिताफीने पकडला.