०२ – जुलाई. ‘सृष्टी फाउंडेशन’ तर्फे साजरा करण्यात आला ‘डॉक्टर्स डे’

तालुक्यातील सृष्टी फाउंडेशन यांच्याकडून डॉक्टर्स डे व कृषी दिवस साजरा करण्यात आला संस्थेचे सदस्य शुभम नंदागवळी, स्वप्नील राऊत यांनी आपल्या टीम सोबत शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर यांना एक वृक्ष देऊन त्यांना सन्मानित केला. त्यावेळी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा येथील विद्यार्थी उमेश उदापुरे, हिना ठावकर आधी उपस्थित होते.

अंधश्रद्धेने घेतला आणखी एकाचा बळी.

🛑☝️ *सावंगी; अंधश्रद्धेने घेतला आणखी एकाचा बळी.*
https://news24today.in/3367

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
*• न्यूज २४ टुडे*
__________________________
*• प्रधान संपादक*
__________________________
*• वेद परसोडकर*
__________________________

बाह्मणी सडक येथील 29 वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यू https://publicapp.co.in/video/sp_34ymradrqgfuh?share=true

We Celebrate Foundation Day – स्थापना दिवस साजरा करणे.

दिनांक १७/०६/२०१६ रोजी आपल्याला निसर्ग मित्र मंडळ सडक अर्जुनी या संस्थेचे नोंदणीकृत “सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहु.उद्देशीय संस्था सडक अर्जुनी” या नावाने धर्मदाय आयुक्त गोंदिया यांच्या कडून प्रमाणपत्र मिळाले.

याच अनुषंगाने आपण दरवर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावामध्ये राबवीत असतो. ह्यावर्षी संस्थेला सहावा वर्ष सुरू होत आहे. पावसाळ्याची चाहूल लागली आहे आणि हा योग्य वेळ आहे वृक्षारोपणाचा. यावर्षी आपण ६ रोपटे लावणार असून आपण सादर आमंत्रित आहात.

भारतीय अंडीखाऊ साप
Indian Eggeater Snake

शास्त्रीय नाव: Elachistodon Westermannis

अर्धविषारी साप

रंग : तपकिरी रंगाच्या शरीरावर काळसर ठिपके, पट्टे, पोटांचा रंग काळपट पिवळ्या रंगाचे ठिपके.

लांबी : २ ते अडीच फूट

भक्ष्य : पक्षी, पक्ष्यांची अंडी इ.

वसतिस्थान : झाडावर व जमिनीवर

प्रजनन : या सापाची मादी ५ ते ८ अंडी देते.

वैशिष्ट्ये : भारतीय अंडीखाऊ साप नामशेष झाला असे समजले जायचे; परंतु त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, जळगांव इ. ठिकाणी सापडला. त्यामुळे या सापाविषयी थोडीफार माहिती उपलब्ध झाली आहे. हा साप काहीसा तस्कर या सापासारखा दिसतो. या सापाच्या तोंडाची रचना अंडे खाल्ल्यावर तोंडातल्या तोंडात फोडून त्यातील द्रवपदार्थ पोटात गिळतो व अंड्यांचे कवच तोंडातून बाहेर फेकून देतो. याच वैशिष्ट्यामुळे या सापाचे नाव भारतीय अंडीखाऊ साप हे पडले. हा साप झाडावर, जमिनीवर राहणारा असल्याने त्याची शरीर रचना सडपातळ आहे. हा साप जमीन व झाडावर सहज वावरतो. जमीन व झाडावर पक्ष्यांची घरटी शोधून त्यातील पक्षी व अंडी खातो. त्यातही अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहे.

प्रजाती : भारतीय अंडी खाऊ सापाची एकच जात भारतात सापडते.

पुस्तक : सापांची अद्भुत दुनिया सर्पमित्र प्राध्यापक ज्ञानेश्वर मात्रे

हिरवा दिवड
Olive Keeliack Sanke

शास्त्रीय नाव: Atretium Schistosum

बिनविषारी साप

रंग : ऑलिव्ह फळासारखा हिरवट रंगाचा, तांबड्या
रंगाच्या शरीराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूने लांब
रेषा, पोटाकडचा भाग पिवळसर, नारिंगी रंगाचा
असतो. चकचकीत खवले.

भक्ष्य : मासे व बेडूक इत्यादी

लांबी : २ ते ३ फुटापर्यंत

वसतिस्थान : नदी, तलाव, पाणवठ्याच्या ठिकाणी,
पाण्यात व काठावरील हिरव्या गवतात राहणे पसंत
करतो.

प्रजनन : या सापाची मादी २० ते २५ अंडी देते.

वैशिष्ट्य : हिरवा दिवड हा साप गुळगळीत व
चमकदार खवल्यांचा असल्याने दिसायला खूप सुंदर
दिसतो. तो नदीच्या जवळ गवतात व समुद्राच्या
खाड्यांमध्ये राहणे पसंत करतो. हा साप केरळ, पश्चिम
बंगाल, ओरिसा भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.

हिरवा दिवड हा साप भक्ष्य पकडण्यासाठी मासे
किंवा बेडकाच्या पुढे पोहत जाऊन अचानक
त्याच्यावर हल्ला करून पकडतो व भक्ष्य मिळवितो. हा
साप काहीवेळा डासांच्या आळ्याही खाताना दिसतो.
त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात राहणे पसंत
करतो. हा साप दिवड सापाप्रमाणे काहीसा चिडखोर
स्वभावाचा आहे.

प्रजाती: हिरवा दिवड या सापाच्या भारतात २४ जाती
सापडतात.

हिरवा दिवड, हिरवा पश्चिमी दिवड, नानेटी,
निकोबर दिवड, बाऊलेंगरर्स पट्टेरी दिवड, खासी
दिवड, गुंथर्स दिवड, पेल्स दिवड, चेरापुंजी दिवड,
ठिपक्याचा दिवड, अंदमान दिवड, चायनीज दिवड,
बेडोम्स दिवड, त्रिकोणी ठिपक्याचा दिवड, हिमालयीन
दिवड, लाल मानेचा दिवड, पहाडी हिमालयीन दिवड,
जॉन्स दिवड, काळ्या पोटाचा दिवड इ.

Rescue Form – रेस्कु फॉर्म

सृष्टी फाॅउंडेशन सडक अर्जुनी च्या सदस्य सर्पमित्र यांनी साप किंवा इतर प्राणी रेस्क्यू केल्यानंतर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन सदर फॉर्म भरणे.

https://forms.gle/ScR24spYSMymxhdd8

शहीद दिन – २३ मार्च – रक्तदान शिबीर​

स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी या सर्वाना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असतो. या मध्ये ब्रिटीश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ३३ मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. 

त्या निमित्याने आपली सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी पो. ता. सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र १४१/१६ [गों] तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद दिवस निमीत्त शहिदांना भावपुर्ण श्रदांजली स्वरुप “रक्तदान शिबीर” घेण्याचे ठरविले आहे. स्थळ : भारतीय स्टेट बँक जवळ, डॉ. परमानंद कठाणे यांच्या बाजुला, मेन रोड सडक अर्जुनी जि. गोंदिया, दिनांक : २३ मार्च २०२१ रोज मंगळवार, वेळ : सकाळी ११.०० ते सायं.५.०० वाजे पर्यंत. अधिक माहितीसाठी संपर्क करा. +९१ ८२०८४४९९२०

तसेच आपल्या संस्थेने तालुका रक्तदाता सूची – सडक अर्जुनी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या सुचीमध्ये नाव समाविष्ट करणाऱ्या रक्तदात्यांना तालुक्यात कुठेही रक्तदानाचेेेे कार्यक्रम घेण्या आपल्यालाा व्हाट्सअ मेसेज तसेच फोन द्वारे कळविण्यात येईल. तरी इच्छुक रक्तदात्यांनी खाली दिलेल्यााााा लिंक वर आप आपल्या नावाची नोंदणीी करावी

ल्यावरकततमम कुठेही रक्तदानाचेेेे कार्यक्रम घेण्या ततम तालुक्यात कोठेही रक्तदानाचे कार्यक्रम घेण्यात आले असता आपल्याला फोन, मॅसेज किंव्हा व्हॉट्सॲप करून कळविण्यात येईल. तरी इच्छुकांनी खाली दिलेल्या लिंक वर आपले नाव नोंदवावे आणि रक्तदान करावे.

नाव नोंदणी फार्म : https://forms.gle/tXP1Uc3QqakfKQDeA

तालुका रक्तदाता सूची – सडक अर्जुनी

सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी पो. ता. सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र १४१/१६ [ गोंदिया ] यांच्या मार्फत तालुक्यातील सर्व रक्तदात्यांची सूची तयार करण्याचे काम हाती घेतलं आहे. तालुक्यात कोठेही रक्तदानाचे कार्यक्रम घेण्यात आले असता आपल्याला फोन करून कळविण्यात येईल. तरी आपण आपली नोंदणी या फार्म द्वारे करून घ्यावी. ही विनंती.

🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

नोंदणी फॉर्म –
https://forms.gle/tXP1Uc3QqakfKQDeA