भारतीय अंडीखाऊ साप
Indian Eggeater Snake
शास्त्रीय नाव: Elachistodon Westermannis
अर्धविषारी साप
रंग : तपकिरी रंगाच्या शरीरावर काळसर ठिपके, पट्टे, पोटांचा रंग काळपट पिवळ्या रंगाचे ठिपके.
लांबी : २ ते अडीच फूट
भक्ष्य : पक्षी, पक्ष्यांची अंडी इ.
वसतिस्थान : झाडावर व जमिनीवर
प्रजनन : या सापाची मादी ५ ते ८ अंडी देते.
वैशिष्ट्ये : भारतीय अंडीखाऊ साप नामशेष झाला असे समजले जायचे; परंतु त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, जळगांव इ. ठिकाणी सापडला. त्यामुळे या सापाविषयी थोडीफार माहिती उपलब्ध झाली आहे. हा साप काहीसा तस्कर या सापासारखा दिसतो. या सापाच्या तोंडाची रचना अंडे खाल्ल्यावर तोंडातल्या तोंडात फोडून त्यातील द्रवपदार्थ पोटात गिळतो व अंड्यांचे कवच तोंडातून बाहेर फेकून देतो. याच वैशिष्ट्यामुळे या सापाचे नाव भारतीय अंडीखाऊ साप हे पडले. हा साप झाडावर, जमिनीवर राहणारा असल्याने त्याची शरीर रचना सडपातळ आहे. हा साप जमीन व झाडावर सहज वावरतो. जमीन व झाडावर पक्ष्यांची घरटी शोधून त्यातील पक्षी व अंडी खातो. त्यातही अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहे.
प्रजाती : भारतीय अंडी खाऊ सापाची एकच जात भारतात सापडते.
पुस्तक : सापांची अद्भुत दुनिया सर्पमित्र प्राध्यापक ज्ञानेश्वर मात्रे