Month: July 2022

सृष्टी फाउंडेशन चे अभिनव उपक्रम.

तालुक्यातील सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी येथे विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पृथ्वी वाचवा असा संदेश देण्यात आला आणि पर्यावरण बचाव या विषयावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या मुख्य स्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका एम. बी. गहाणे तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल मेश्राम सर, नेहमीचंद गिरीपुंजे सर, डी. पी. डोंगरवार सर होते. संस्थेचे सदस्य राज खोब्रागडे, शुभम नंदेश्वर, मोहित नंदागवळी आधी सदस्य उपस्थित होते. तसेच अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज (वडसा) येथील हिना ठवकर, उमेश उदापुरे, रीना टेंभुर्णे, रागिनी कन्नमवार आणि उर्वशी मोहूर्ले आधी विद्यार्थी उपस्थित होते.

०२ – जुलाई. ‘सृष्टी फाउंडेशन’ तर्फे साजरा करण्यात आला ‘डॉक्टर्स डे’

तालुक्यातील सृष्टी फाउंडेशन यांच्याकडून डॉक्टर्स डे व कृषी दिवस साजरा करण्यात आला संस्थेचे सदस्य शुभम नंदागवळी, स्वप्नील राऊत यांनी आपल्या टीम सोबत शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर यांना एक वृक्ष देऊन त्यांना सन्मानित केला. त्यावेळी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा येथील विद्यार्थी उमेश उदापुरे, हिना ठावकर आधी उपस्थित होते.