Sankes Of Gondia

स्नेक्स ऑफ गोंदिया या पेज मध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळणारे साप तसेच सरपटणारे प्राण्यांबद्दल माहिती दिली आहे. सदर माहिती ही पुस्तके, लेख, सोशियल मीडिया तसेच इंटरनेट वरून घेतलेली आहे. सदर माहितीवर संस्थेच्या कॉपीराइट नाही.

निमविषारी साप

मराठी नाव -: जाड रेती सर्प (निमविषारी)
इंग्लिश नाव -: Stout Sand Snake
शास्त्रीय नाव -: Psammophis longifrons

सरासरी लांबी -: १०० सें.मी. ( ३ फुट ३ इंच )
अधिकतम लांबी -: १२३ सें.मी. ( ४ फुट )
रंग व आकार -: मानेकडील भाग राखाडी, बाकी शरीर तपकिरी. खवळ्यांच्या बाहेरच्या बाजूला काळा रंग. पोटाकडचा भाग राखाडी. स्थूल शरीर.
प्रजनन -: प्रजननाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
खाद्य -: मुख्यतः पाली आणि सापसुरळ्या.
आढळ -: महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी
वास्तव्य -: जमिनीवर तसेच झाडांवर राहतो.
वैशिष्ट्ये -: दिनचर. सहसा चावत नाही. विषाचे दात वरच्या जबड्याच्या मागच्या बाजूला. विषाची तीव्रता कमी असल्याने माणसाला फक्त सूज येते; माणूस मरत नाही. नाव जरी रेती सर्प असले तरी कधीही रेतीमध्ये सापडत नाही.
पुस्तक -: साप, गुरुवर्य (निलीमकुमार खैरे)