EcoBricks – इकोब्रिक्स

प्रत्येकाच्या जगण्यात वस्तूंचा वाढता वापर असल्याने टाकाऊ प्लास्टिकचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यातही सामान्य माणसांच्या वापरात बहुतांश वेळा अविघटनशील प्लास्टिकच असते. कचर्‍यात समाविष्ट झालेले हे कमी जाडीचे प्लास्टिक वर्षानुवर्षे पृथ्वीवर भार बनून राहते आणि पॉलिथिनसारख्या वस्तूंचे विघटन होण्यास तर साधारणतः 500 वर्षांपेक्षाही जास्त वर्षे लागतात. या कचर्‍यापासून पर्यावरण संरक्षण गतीविधी संस्थेने ‘इकोब्रिक्स’ तयार करण्याचा उपक्रम राबविला आहे. खरे तर हा प्रकल्प आता देशपातळीवर सुरू आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे मानवाच्या हातात आहे आणि त्यासाठी ‘इकोब्रिक्स’ हा सर्वोत्तम पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे. ह्याची तयार करण्याची पद्धतही आटोपशीर असल्याने कुणी कुठूनही सहज सुरुवात करू शकतात. प्लास्टिकची पाण्याची किंवा शीतपेयांची बाटली याकरिता उपयोगात आणली जाते. त्यामध्ये प्लास्टिकच्या आणि पॉलिथिनच्या वस्तू तसेच तुकडे, वापरलेले प्लास्टिक खच्चून भरले जातात. असे भरपूर प्लास्टिक भरलेल्या बाटलीला ‘इकोब्रिक’ असे नाव देण्यात आले आहे. पुनर्वापर आणि पुन:प्रक्रिया न होणारे प्लास्टिक, वेफर्सची रिकामी पाकिटे, हेअरपिन्स, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक अशा अनेक गोष्टी यामध्ये भरण्यात येतात. मात्र, दुधाच्या पिशव्यांसारखे पुन:प्रक्रिया होऊ शकणारे प्लास्टिक, सडणारे खाद्यपदार्थ यामध्ये वापरले जात नाहीत. सुमारे शंभर चौरस फूट जमिनीवर पसरू शकतील, इतक्या प्लास्टिकला एका एक लीटरच्या बाटलीत भरता येऊ शकते. अशा भरलेल्या बाटल्या कचर्‍यात टाकल्या, तर कचरा संकलन करणार्‍यांनाही ते सोयीचे ठरते. प्रत्येक बाटलीत कचरा भरताना प्रत्येक वेळी चाचणी करून घ्यायला हवी. एका हाताने बाटली पिळून टाकतात आणि जर बाटली पिळली तर अधिक प्लास्टिक भरता येईल.

इकोब्रिक्स’च्या धारण करण्याच्या क्षमतेबद्दल अधिक जाणून घेऊ या. 250 मि.ली. = 100 ग्रॅम,

500 मि.ली. = 180 ग्रॅम,

600 मि.ली. = 200 ग्रॅम,

1 लीटर = 350 ग्रॅम,

1.50 लीटर = 500 ग्रॅम,

2 लीटर = 600 ग्रॅम.

आपण ह्यावरून साधारण अंदाज घेऊ शकतो की इकोब्रिकची प्लास्टिक साठवण्याची क्षमता आपण करणार्‍या कचर्‍याच्या किती पट आहे. आपण माणसाने कमीत कमी प्रत्येकाने 10 इकोब्रिक्स करण्याची गरज आहे, म्हणजे आपल्या देशातील कचर्‍याचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होऊ शकेल.

रिकामे टाकाऊ बॉटल्स हवे असल्यास आम्हाला संपर्क करा.

तुमच्याकडे इकोब्रिक्स तयार असतील आणि सद्या त्यांचा उपयोग नसल्यास तुम्ही ते संस्थेला दान करू शकता.