Secretory

घोणस (रसेल्स व्हायपर) व्हायपेरा रसेली (Vipera russelli)

मराठी : घोणस, कांडर, ठवऱ्या महाडोर..

विशिष्ट लक्षणे : आकाराने मध्यम, पण कधीकधी मोठेही आढळून येतात. शरीराच्या वरच्या भागावर कणेदार खवले, तसेच, लांब आणि गोल गडद रंगाचे ठिपके. डोके त्रिकोणी.

सरासरी लांबी : नर 1 मी. जन्मतः 24 सें. मी.; कमाल : 1.8 मीटर.

वर्णन : घोणस अंगाने जाडगेला असतो. त्याच्या शरीरावर खरबरीत खवले असतात. डोळ्यांतील बाहुली उभी असते. वरील अंगाचा रंग कधी तपकिरी, तर कधीकधी पिवळटही असतो. सर्व अंगावर गहिऱ्या रंगाचे चकचकीत लांब तसेच, गोल ठिपके असतात. या ठिपक्यांच्या कडा पांढऱ्या व काळ्या रंगाच्या असतात. पश्चिम भागात सापडणाऱ्या घोणसाच्या पोटाचा रंग पांढरा असतो. आग्नेय भारतात आढळून येणाऱ्या घोणसाच्या उपजातीच्या पोटावर दाट ठिपके असतात. अंगावरील रंगांतही विविधता असते. जाडगेले शरीर, त्रिकोणी डोके आणि पाठीवरील साखळीप्रमाणे एकमेकांना जोडलेल्या ठिपक्यांवरून त्याची ओळख पटते. घोणस दिसायला निरुपद्रवी मांडवळीसारखे असतात. मांडवळ मात्र आकाराने लहान असून, त्यांची शेपटीही टोकदार नसते. तसेच अंगावरील ठिपक्यांना कसलाही आकार नसतो. पाठीवरील तुकतुकीत व एकसारख्या असलेल्या ठिपक्यांमुळे घोणस व मांडवळांमधील फरक लक्षात येतो. भारतातील चार भयंकर विषारी सर्पात घोणसाची गणना होते. घोणसाची एक मोठी उपजात लेव्हन्टाइन व्हायपर म्हणून ओळखली जाते. तपकिरी वर्णाचा हा जाडगेला साप प्रामुख्याने काश्मीर भागात आढळतो, त्याची वाढ दीड मीटर लांबीपर्यंत होते. वितरण : भारतातील डोंगर व पठारांवर सर्वत्र 3000 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात.

निवासस्थान : डोंगराळ भागातील उजाड प्रदेशांत, तसेच, शेतीला लागून असलेल्या पठारावरील झुडपी जंगलांत पोणस आढळून येतात. उन्हाळ्यात वाळवीचे वारूळ, तसेच, घुशीच्या बिळांचा आश्रय घेतात. परंतु मोठ्या दगडांतील फटी, पाचोळा, गवत, काटेरी झुडपे व निवडुंगाची बेटे ही त्याची विशेष निवासस्थाने आहेत. केवड्याचे वन व घायपाताची बेटे येथेही ते आढळू येतात.

सवयी : घोणस स्वभावाने सुस्त असला, तरी चवताळला, म्हणजे वेगाने जमिनीवर तिथल्यातिथेच उसळी मारतो. तो जोराने हिस हिस आवाज करुन फूत्कार सोडतो व स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी कडकडून चावतो. स्वभावाने ते भित्रे असतात. नाग व इतर सापांचा माणसाशी जितका संबंध येतो, तितका घोणसाचा येत नाही. इतर साप माणसाला पाहताक्षणी निसटून जातात. रोपवनातील, चहा व कॉफीच्या मळ्यांतील, तसेच, शेतातील कामगारांना घोणसांचा दंश होतो. या क्षेत्रात वावरणाऱ्या कामगारांचा झुडपांत राहणाऱ्या घोणसांना हात लागतो किंवा त्यांच्यावर पाय पडतो. त्यामुळे ते त्यांना दंश करतात.

वीण : मे-जुलै महिन्यांत मादी 20-40 पिलांना जन्म देते. पिलेदेखील अतिशय तेजस्वी असतात; आणि ती जणू मोठ्या सापांच्या प्रतिकृतीच दिसतात.

भक्ष्य : पिंजऱ्यात पकडून ठेवलेल्या लहान घोणसाने स्वजातीय सापांना खाल्ल्याचे आढळून आले. तसेच, इतर जातींचे सर्प, सरडे, उंदीर, जमिनीवरील खेकडे यांवरही ते गुजराण करतात. ते विंचू व इतर कृमिकीटकही खात असावेत. मोठे साप मात्र पूर्णपणे कृंतक प्राण्यांवर उपजीविका करतात. कधीकधी ते पक्षीही पकडून खात असावेत. दक्षिण भारतात ते मुख्यत्वे उड्या मारणाऱ्या जरबिल उंदरांवर गुजराण करतात.

स्थिती : दक्षिण भारतातील कातडी कमावण्याच्या कारखान्यामध्ये घोणसांचे कातडे कमावण्याला विशेष महत्त्व आहे. काही क्षेत्रांत वर्षभर त्यांची कातडी गोळा केली जात असल्याने त्या भागात घोणस आता पूर्णपणे नामशेष होत आहेत.

विष : भारतातील सर्व विषारी सापांमध्ये घोणसाचे विष जहाल समजले जाते. म्हणून रोग्यावर विषप्रतिबंधक लशीचा योग्य प्रमाणात उपचार केला पाहिजे. घोणसाचे अतिजहाल विष रक्तात त्वरित मिसळते, म्हणून रक्तस्राव थांबविण्याकरिता जी औषधे वापरली जातात, त्यांत घोणसाच्या विषाचा उपयोग करतात. तसेच, रक्तविज्ञानाच्या अभ्यासातदेखील घोणसाच्या विद्याला अधिक प्राधान्य दिले जाते.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली

हिवाळ्यात घोणस सापापासून सावधगिरी बाळगा

Source Internet

“हिवाळ्यात घोणस सापापासून सावधगिरी बाळगा”

थंडीची चाहूल लागली की मोठ्या प्रमाणावर घोणस दिसायला लागतात. थंडीचा काळ हा घोणस सापांचा मिलनकाळ असतो.

घोणस सापांचा मिलनकाळ हा सामान्य लोकांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो, त्यामुळे थंडीच्या दिवसात सावधगिरी बाळगा.

घोणस बोजड शरीराचा साप असून जवळपास 3 ते 5 फूट लांबीचा असतो. शरीराच्या मधल्या भागाचा घेर सु. १५ सेंमी. असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान शल्क (खवले) असतात. प्रत्येक शल्कावर उभे आडे (कील) असल्यामुळे घोणसाचे अंग खरबरीत असते. शेपूट लहान असते. पाठीकडचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून मानेपासून शेपटीपर्यंत मध्यरेषेवर लंबवर्तुळाकार गडद, काळे, भरीव किंवा पोकळ असे २३ ‒ ३० सलग ठिपके असतात. प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. मधल्या रांगेखेरीज प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे काळ्या ठिपक्यांच्या आणखी दोन रांगा असतात. या दोन्ही रांगांतील ठिपके आकाराने लहान असतात आणि ते सलग नसतात. पोटाचा रंग फिकट पांढरा असून त्यावर रुंद व आडवे पट्टे असतात. जाड शरीर, त्रिकोणी डोके, लहान शेपूट आणि पाठीवरील ठिपक्यांच्या तीन रांगा या विशेषांवरून घोणस चटकन ओळखता येतो. डोळ्यांच्या बाहुल्या उभट व लंबवर्तुळाकार असून त्याभोवतालच्या पडदयावर सोनेरी कण असतात. नाकपुडया मोठया असून त्यातून फुप्फुसातील हवा जोराने बाहेर टाकत तो फुत्कार करतो. फुत्काराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो. या आवाजादवारे हा त्याच्या शत्रूला अस्तित्वाची जाणीव करून देतो. नर मादीहून काहीसा लांब असतो घोणस सापाचे विषदंत सुमारे १३ मिमी. लांब आणि पोकळ असतात. इतर सापांच्या तुलनेत ते मोठे असतात. तोंड मिटलेले असताना विषदंत जबड्याला समांतर अशा अवस्थेत असतात. दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांची हालचाल होऊन विषदंत जबडयाशी काटकोनात उभे होतात आणि भक्ष्याच्या शरीरात विष टोचले जाते.

उंदीर, बेडूक, सरडे हे घोणसाचे भक्ष्य असल्यामुळे शेतजमिनीत व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्यवस्तीतही तो आढळतो. उंदीर, बेडूक, सरडे यांच्या मागावर असल्याने तो शहरी भागातही पुष्कळदा दिसतो. पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो. तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसादेखील निर्धास्तपणे वावरतो.

गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. अशा प्राण्यांना अंडजरायुज म्हणतात. घोणस मादीला पिले होतात. घोणसाच्या एका मादीने तीन दिवसांत ९६ पिलांना जन्म दिल्याची नोंद आहे.

Source Internet


🌿🐍🐍🐍🐍🐍🐍🌿


घोणस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही. माणसाची अगर अन्य शत्रूची चाहूल लागताच शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडविण्याकडे त्याचा कल असतो. या वेटोळ्यात तो शरीराच्या पुढच्या एकतृतीयांश भागाला इंग्रजीतल्या ‘S’ अक्षराचा आकार देतो. क्षणार्धात हा भाग सरळ करून तो शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ शकतो. घोणसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्राने जखम करून विषमिश्रित रक्ताचा स्राव करू देण्याची पद्धत अत्यंत चुकीची व जीवघेणी ठरू शकते. हातपायाला दंश झाला असता तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकरवी प्रतिविष टोचणे, हा त्यावर इलाज आहे. विजेच्या चपळाईने तो आक्रमण करू शकतो. नवशिक्या युवकांनी घोणसाला पकडण्याचे धाडस करू नये. घोणसाची ताकद, चपळाई आणि त्याच्या आक्रमणाच्या दिशेची लवचिकता याबद्दलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे चूक जीवावर बेतू शकते.


🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍


घोणसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त कोशिका फुटतात. मुत्राशय निकामी होवु शकते. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. ग्रामीण आणि कृषिप्रधान परिसंस्थेत उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून घोणसला विशेष महत्त्व आहे.

9 फूट अजगराचे वाचविले जीव.

दिनांक 2/11/ 2022 ला सडक अर्जुनी तालुक्यातील श्री प्रणित जागेश्वर पटोले यांच्या शेतात धान कापत असतांना मजुरांच्या पायाजवळ 9 फूट लांबीचा एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अजगर मोठा असल्याने शेतात काम करणाऱ्या व शेतकऱ्यांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढत होती यावेळी श्री प्रणित पटोले यांनी कुठलाही विचार न करता त्वरित नेहमी सेवा देणारी संस्था सृष्टी फाऊंडेशन सडक अर्जुनी चे सदस्य सर्पमित्र व प्राणीमित्र मोहित नंदागवळी व राज खोब्रागडे यांना फोन करून बोलवून घेतले. यावेळी त्वरित दोघेही सर्पमित्र शेतात पोहोचले व त्यांनी लोकांना दूर करून सावधतेने त्या विशाल अजगराला कोणत्याही पद्धतीची इजा न होऊ देता सुखरूप रित्या पकडले. यावेळी शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण त्या सापाला पकडल्यावर लक्षात आले की त्याच्या तोंडाला इजा झाली आहे. त्याला प्रथमोपचाराची गरज आहे, त्यामुळे संस्थेचे सदस्य जोशील नंदागवळी यांना बोलवून पशुवैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी यांच्याकडे नेण्यात आले. सापाचा प्रथम उपचार करण्यात आला. नंतर सापाला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. संस्थेचे सचिव उमेश उदापुरे सदस्य शुभम नंदेश्वर, हर्ष राऊत आणि वनविभागाचे अधिकारी आनंद बंसोड आदी उपस्थित होते.
संध्या थंडीचे व धान कटाईची वेळ सुरु असून शेतकरी व मजूर शेतात निर्भय होऊन काम करीत असतात, या वेळी उन सेकण्यासाठी साप धान्याचा मोकळ्या बांध्यात झोपलेले असतात. त्यामुळे धानाच्या कडपा, बोझे उचलताना नीट बगून घ्यावे. असे आव्हाहन संस्थेचे सचिव उमेश उदापूरे यांनी केले.

Rescue Spectacule Cobra

भागवत चव्हाण बोथली यांच्या येथे पाच फूट लांबीचा भारतीय चष्मा नाग पकडण्यात आला त्यावेळी संस्थेचे सर्पमित्र शुभम नंदेश्वर, गौरव गाते, अमन राऊत, अश्विन नंदेश्वर आणि ग्रामस्थ परमानंदजी बागडे सर उपस्थित होते.