रंग : तपकिरी रंगाच्या शरीरावर काळसर ठिपके, पट्टे, पोटांचा रंग काळपट पिवळ्या रंगाचे ठिपके.
लांबी : २ ते अडीच फूट
भक्ष्य : पक्षी, पक्ष्यांची अंडी इ.
वसतिस्थान : झाडावर व जमिनीवर
प्रजनन : या सापाची मादी ५ ते ८ अंडी देते.
वैशिष्ट्ये : भारतीय अंडीखाऊ साप नामशेष झाला असे समजले जायचे; परंतु त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, जळगांव इ. ठिकाणी सापडला. त्यामुळे या सापाविषयी थोडीफार माहिती उपलब्ध झाली आहे. हा साप काहीसा तस्कर या सापासारखा दिसतो. या सापाच्या तोंडाची रचना अंडे खाल्ल्यावर तोंडातल्या तोंडात फोडून त्यातील द्रवपदार्थ पोटात गिळतो व अंड्यांचे कवच तोंडातून बाहेर फेकून देतो. याच वैशिष्ट्यामुळे या सापाचे नाव भारतीय अंडीखाऊ साप हे पडले. हा साप झाडावर, जमिनीवर राहणारा असल्याने त्याची शरीर रचना सडपातळ आहे. हा साप जमीन व झाडावर सहज वावरतो. जमीन व झाडावर पक्ष्यांची घरटी शोधून त्यातील पक्षी व अंडी खातो. त्यातही अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहे.
प्रजाती : भारतीय अंडी खाऊ सापाची एकच जात भारतात सापडते.
पुस्तक : सापांची अद्भुत दुनिया सर्पमित्र प्राध्यापक ज्ञानेश्वर मात्रे
रंग : ऑलिव्ह फळासारखा हिरवट रंगाचा, तांबड्या रंगाच्या शरीराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूने लांब रेषा, पोटाकडचा भाग पिवळसर, नारिंगी रंगाचा असतो. चकचकीत खवले.
भक्ष्य : मासे व बेडूक इत्यादी
लांबी : २ ते ३ फुटापर्यंत
वसतिस्थान : नदी, तलाव, पाणवठ्याच्या ठिकाणी, पाण्यात व काठावरील हिरव्या गवतात राहणे पसंत करतो.
प्रजनन : या सापाची मादी २० ते २५ अंडी देते.
वैशिष्ट्य : हिरवा दिवड हा साप गुळगळीत व चमकदार खवल्यांचा असल्याने दिसायला खूप सुंदर दिसतो. तो नदीच्या जवळ गवतात व समुद्राच्या खाड्यांमध्ये राहणे पसंत करतो. हा साप केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.
हिरवा दिवड हा साप भक्ष्य पकडण्यासाठी मासे किंवा बेडकाच्या पुढे पोहत जाऊन अचानक त्याच्यावर हल्ला करून पकडतो व भक्ष्य मिळवितो. हा साप काहीवेळा डासांच्या आळ्याही खाताना दिसतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात राहणे पसंत करतो. हा साप दिवड सापाप्रमाणे काहीसा चिडखोर स्वभावाचा आहे.
प्रजाती: हिरवा दिवड या सापाच्या भारतात २४ जाती सापडतात.
हिरवा दिवड, हिरवा पश्चिमी दिवड, नानेटी, निकोबर दिवड, बाऊलेंगरर्स पट्टेरी दिवड, खासी दिवड, गुंथर्स दिवड, पेल्स दिवड, चेरापुंजी दिवड, ठिपक्याचा दिवड, अंदमान दिवड, चायनीज दिवड, बेडोम्स दिवड, त्रिकोणी ठिपक्याचा दिवड, हिमालयीन दिवड, लाल मानेचा दिवड, पहाडी हिमालयीन दिवड, जॉन्स दिवड, काळ्या पोटाचा दिवड इ.